शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘सीपीटी’मध्ये ‘फर्स्ट क्लास’ : दृष्टीहीन नाशिकच्या वेदांतचे सीए होण्याचे स्वप्न झाले प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 9:30 PM

अझहर शेख, नाशिक : येथील रहिवासी असलेला वेदांत उमेश मुंदडा या विद्यार्थ्याने दहावी, बारावीच्या परिक्षेप्रमाणेच आपल्या यशाची उज्ज्वल कामगिरीमध्ये सातत्य राखून सीपीटीच्या परिक्षेत ‘फर्स्ट क्लास’ मिळविला आहे. तो भारतासह अन्य पाच देशांमधील परिक्षार्थ्यांमध्ये एकमेव दृष्टीबाधित विद्यार्थी होतानियतीने जरी वेदांतच्या झोळीत अंधत्व टाकले असले तरी त्याला तल्लख बुध्दीमत्ता प्रदान केली आहे. ...

ठळक मुद्देसीपीटीच्या परिक्षेत ‘फर्स्ट क्लास’ मिळविलाएकूण २०० गुणांच्या परिक्षेत एकूण १३५ गुण मिळविले. भारताततून वेदांतच्या रुपाने एकमेव दृष्टिबाधित परिक्षार्थी 'सीपीटी'चा अभ्यास करताना ब्रेल भाषेत कुठलेही पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत

अझहर शेख, नाशिक : येथील रहिवासी असलेला वेदांत उमेश मुंदडा या विद्यार्थ्याने दहावी, बारावीच्या परिक्षेप्रमाणेच आपल्या यशाची उज्ज्वल कामगिरीमध्ये सातत्य राखून सीपीटीच्या परिक्षेत ‘फर्स्ट क्लास’ मिळविला आहे. तो भारतासह अन्य पाच देशांमधील परिक्षार्थ्यांमध्ये एकमेव दृष्टीबाधित विद्यार्थी होतानियतीने जरी वेदांतच्या झोळीत अंधत्व टाकले असले तरी त्याला तल्लख बुध्दीमत्ता प्रदान केली आहे. यामुळे वेदांतची यशोशिखराची वाट प्रकाशमान झाली आहे.सनदीलेखापाल (सीए) परिक्षेला पात्र होण्यासाठी द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटन्टस् आॅफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या सीपीटीच्या परिक्षेत वेदांतने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविले. चार विषयांचे पेपर देत त्याने एकूण २०० गुणांच्या परिक्षेत एकूण १३५ गुण मिळविले. फंडामेंटल अकौंट विषयात त्याला सर्वाधिक ६० पैकी ४५ गुण मिळाले आहे. एकूणच वेदांतचे सीए होण्याच्या स्वप्नाची मुख्य वाट या परिक्षेच्या चमकदार यशाने प्रकाशमान झाली आहे.विशेष म्हणजे नेपाळ, दुबई, मस्कद व अबुधाबी या सर्व देशांमध्ये सीपीटीची परिक्षा पार पडली; मात्र यावर्षी दृष्टिबाधित श्रेणीत एकही परिक्षार्थी परिक्षेसाठी कुठल्याही देशामध्ये प्रविष्ट झाला नव्हता. केवळ भारतात महाराष्टमधील नाशिक जिल्ह्यातून वेदांतच्या रुपाने एकमेव दृष्टिबाधित परिक्षार्थी सीपीटीची परिक्षा देत होता.सीपीटी परिक्षेचा अभ्यास करताना वेदांतला ब्रेल भाषेत कुठलेही पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. वेदांतने केवळ श्रवणशक्ती आणि बुध्दीमत्तेच्या जोरावर आपल्या जीद्दीने सीपीटीचा अभ्यास करत यश मिळविले आहे. वेदांत हा दहावी व बारावीच्या परिक्षेत दृष्टिबाधितांमध्ये राज्यात टॉपर ठरला होता.

सरकार अन् समाजाने आमच्यावर विश्वास दाखवावादृष्टीबाधित विद्यार्थ्यांवर सरकार व समाजाने विश्वास दाखविणे काळाची गरज आहे. तरच आम्ही मुख्य प्रवाहात येऊ शकू. आमच्यातही क्षमता आहे, स्वत:ला सिध्द करण्याची. सीए होण्याचे माझे स्वप्न आहे, आणि त्यामुळेच ब्रेल लिपीत पाठ्यपुस्तके उपलब्ध नसतानाही मी केवळ तो अभ्यासक्रम ऐकून शिकला. यासाठी मला खूपच त्रास झाला. सरकारने ब्रेल लिपितून सीएसारख्या अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून दृष्टीबाधित विद्यार्थीदेखील सीए होण्याचे स्वप्न बघू शकतील.- वेदांत मुंदडाकेवळ अभ्यासातच नव्हे तर संगीतातही ‘मास्टर’वेदांत हा अभ्यातच हुशार आहे असे मुळीच नाही, तर वेदांत हा दृष्टिबाधित असूनही उत्तम क्रिकेटरही आहे आणि त्याने संगीताने आपल्या व्यंगावरही मात केली आहे. हार्मोनियम, बासरी, सिंथेसायझर तो उत्तमरित्या हाताळतो. तबल्यातही त्याने उत्कृष्ट वादकाची भूमिका बजावली असून गंधर्व महाविद्यालयात तो तबला विशारदाचे धडेही गिरवत आहे. वेदांत बदलत्या काळाबरोबर स्वत:ला ही बदलत असून त्याने आधुनिकतेशीही आपले नाते जोडले आहे. तो उत्तमरित्या स्मार्टफोनचा वापर करत सोशल मिडियावरही सक्रिय असतो 

टॅग्स :Nashikनाशिकeducationशैक्षणिक