शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पहिला दिवस ‘कोरडाच’

By admin | Published: February 02, 2017 1:59 AM

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी नाशिक तालुक्यातील चार गट व आठ गणांसाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन यांनी दिली.दरम्यान, जिल्ह्णात ७३ गट व १४६ गणांसाठी आॅनलाइन अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली असून, सायंकाळपर्यंत नेमके किती अर्ज आले याची माहिती जिल्हा स्तरावरून गोळा करण्याचे काम सुरू होते. प्रत्यक्षात जिल्ह्णासाठीही प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पाटी कोरीच राहिली. येत्या तीन तारखेला शिवसेना-भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास घाईगर्दी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उमेदवारांना थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सहा फेबु्रवारीला पक्षाचे ए.बी. फॉर्म दिले जाण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांसाठी १ ते ६ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ७ फेब्रुवारीला छाननी तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. काल बुधवारी (दि.१) पहिल्याच दिवशी नाशिक तालुक्यातील आठ गण व चार गटांसाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. जिल्ह्णात आॅनलाइन अर्ज दाखल झाले असले तरी प्रत्यक्षात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. पदवीधर मतदारसंघाच्या मतदानानंतर ३ फेब्रुवारीनंतर प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)