पिंपळगाव बाजार समितीचे ठप्प असलेले कांदा लिलाव दहा दिवसांनंतर सुरू झाल्याने रविवारी सायंकाळी शेकडो वाहने बाजार समिती आवारात दाखल झाली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा चाचणी अहवाल तपासला जात होता. बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर स्वत: प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांना कोरोनासंबंधी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करीत होते. कांदा आवकेने पिंपळगाव बाजार समिती आवार गजबजून गेला होता. रविवारीच हजार वाहनांतून सुमारे २५ हजार क्विंटल कांदा आवक झाली होती. यावेळी बाजार समितीत गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
कोट....
प्रशासनाच्या नियमावलीनुसार बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांना कोरोना चाचणी अहवाल दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. अहवाल नसेल तर प्रवेश दिला जाणार नाही. कोविड संसर्ग रोखण्याबरोबरच बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी तपासणी करावी, व्यापारी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदी नियम पाळून लिलाव पुकारतील.
. - दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती
फोटो- २४ पिंपळगाव ओनियन
===Photopath===
240521\24nsk_45_24052021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ पिंपळगाव ओनियन