नाशिक : विभागात २३४ परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी भाषेच्या पेपरला विभागात १९ गैरप्रकारांची (कॉपी) प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात एकही गैरप्रकार घडलेला नाही.गेल्यावर्षी सर्वांत कमी गैरप्रकार घडलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक दहा कॉपीची प्रकरणे समोर आली आहे, तर जळगावमध्ये सात व नंदुरबारमध्ये दोन असे १९ कॉपीची प्रकरणे समोर आली. विभागातून १ लाख ६६ हजार ७१८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात नाशिकच्या ७५ हजार ३४३, धुळे २५ हजार २६४, जळगावमधून ४९ हजार ४०३ व नंदुरबारमधील १६ हजार ४६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
बारावी परीक्षेत पहिल्या दिवशी १९ गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 2:26 AM