- संकेत शुक्लनाशिक - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागात नाशिक प्रथम स्थानावर असून, राज्याचा निकाल बघता नाशिक विभागाची टक्केवारी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. उत्तीर्णतेचे प्रमाण बघता यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात काेकण ९७.५१ टक्के निकालासह प्रथम, तर नाशिक विभाग ९४.७१ टक्के मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक विभागात मुलींचे प्रमाण ९६.३२ टक्के, तर मुलांच्या यशस्वीतेचे प्रमाण ९३.३९ टक्के इतके आहे.
शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक मंडळातून १,५७,३४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. यात ८६,४९१ विद्यार्थी, तर ७०,८५४ विद्यार्थिनींचा समावेश हाेता. यात ८०,७७८ विद्यार्थी, तर ६८,२५१ विद्यार्थिनींनी यश मिळविले. मंगळवारी (दि. २१) दुपारपासून बाेर्डाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला हाेता. विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या या निकालाची तारीख बाेर्डाने जाहीर केल्यानंतर परीक्षार्थींची धाकधूक वाढली हाेती. ऑनलाइन निकाल हाती पडल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते. राज्यात नाशिक दुसरेकोकण ९७.५१नाशिक ९४.७१पुणे ९४.४४कोल्हापूर ९४.२४संभाजीनगर ९४.८.