लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आॅनलाइन प्रवेशप्रक्रिये-अंतर्गत अकरावीची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी (दि.१०) जाहीर करण्यात येणार असून, ल्लं२ँ्र‘.11३ँंे्रि२२्रङ्मल्ल.ल्ली३ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत कला शाखेच्या पाच हजार २०० जागांसाठी ४ हजार ४६१, वाणिज्यच्या ८ हजार ४८० जागांसाठी ९ हजार ३४६ , विज्ञान शाखेच्या ९ हजार ४४० जागांसाठी ११ हजार ७८१ व एचएससीव्हीसी १ हजार ६०० जागांसाठी २६६ अशा एकूण २४ हजार ७२० जागांसाठी तब्बल २५ हजार ८५४ विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची आॅनलाइन गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विविध महाविद्यालयांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा ताण निर्माण होऊ नये, यासाठी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीची चौथी सभा शनिवारी (दि.८) घेण्यात आली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावरील प्रवेशप्रक्रियेच्या नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत सहायक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद, हेमंत धात्रक, डॉ. राम कुलकर्णी, एस. के. शिंदे, डॉ. एस. के. बुवा, वैभव शिरोदे, अशोक बागुल आदि उपस्थित होते. या बैठकीत कोटा अंतर्गत प्रवेशांवरही चर्चा झाली. कोटा अंतर्गत आतापर्यंत दोन हजार ८० प्रवेश झाले असून, विविध महाविद्यालयांनी समर्पित केलेल्या जागांविषयीही चर्चा करण्यात आली.
उद्या अकरावी प्रवेशाची पहिली यादी
By admin | Published: July 09, 2017 12:37 AM