नाशिक : ‘स्मार्ट सिटी’साठी नाशिक महापालिकेने स्थापन केलेल्या ‘नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीची पहिली बैठक बुधवारी (दि.२१) दुपारी १२ वाजता मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे होणार आहे. बैठकीत स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची रचना आणि केंद्राला सादर झालेल्या आराखड्याच्या अंमलबजावणीसंबंधी प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्यापूर्वीच राज्य शासनाने सिडकोच्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून नाशिक महापालिकेला एसपीव्हीची रचना करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, तीन आठवड्यांपूर्वीच महापालिकेने ‘नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ या नावाने कंपनीची स्थापना केली.
‘स्मार्ट सिटी’ कंपनीची आज पहिली बैठक
By admin | Published: September 21, 2016 1:06 AM