लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्यांचे आदेश दिलेले असताना, आता प्रशासनाने सरकारचे मार्गदर्शन मागविल्याने प्रशासनाची ही कारवाई म्हणजे वराती मागून घोडे दामटण्याचा प्रकार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. बदल्यांचे आदेश दिलेले असताना हे मार्गदर्शन कशासाठी अशीही शंका उपस्थित करण्यात येत आहे.येत्या दोन-तीन दिवसात स्थायी समिती सभा असल्याने हा बनाव तर केला जात नाही ? प्रश्न सदस्यांकडून उपस्थित केले जात आहे. त्यातही प्रभारी शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी मार्गदर्शन मागविण्यात आल्याचे यापूर्वीच सांगितलेले आहे. जिल्हातंर्गत आपसी शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी उपस्थित केला होता. या बदली प्रक्रि येत आर्थिक व्यवहार झालेले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. काही शिक्षकांनी दिशाभूल केल्याने त्यावर सरकारचे मार्गदर्शन मागवावे आणि तोपर्यंत बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात येवू नये, असा ठरावही यावेळी स्थायी समितीत झाला होता. मात्र, या ठरावाला केराची टोपली दाखिवत शिक्षण विभागाने शिक्षकांच्या आपसी बदल्यांची कार्यवाही उरकून घेतली. ज्या दिवशी ही बदली प्रक्र ीया पार पाडली त्याच दिवशी शिक्षकांना बदल्यांचे आदेश दिल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. असे असतानाही मार्गदर्शन मागविण्याविषयी प्रभारी शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले होते. आता शिक्षण विभागात शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यासाठी धावपळ सुरू झाली. आदेश तर दिलेले असताना येणाºया स्थायी सभेत झालेल्या ठरावावर काय कार्यवाही केली अशी विचारणा झाल्यास, यावर मार्गदर्शन करण्याची विनंती सरकारला केली जाणार असल्याचे उत्तर देणे सोपे होईल. यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला. आता कुठे प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची स्वाक्षरी झाली आहे. त्यामुळे राजीव म्हसकर यांनी यापूर्वीच मार्गदर्शन मागविण्यासंदर्भात दिलेली माहिती ही सदस्यांची दिशाभूल करणारी असल्याची चर्चा आहे. शिक्षकांना आदेश देऊन मोकळे झालेल्या शिक्षण विभागाला दुसºया स्थायी समितीच्या सभेची वेळ येऊन ठेपल्यावर मार्गदर्शन मागविण्याची उपरती झाली, याबाबतच आता शंका उपस्थित केल्या जात आहे.
आदेश दिल्यानंतर मागविले शासनाचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 6:48 PM