सिडको : कोरोनाच्या महामारीतून हळूहळू बाहेर येत असतानाच आता म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण सिडको परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर हा आजार होत असल्याचे सांगितले जात असून, या रुग्णाच्या बाबतीतही सर्वच प्रकार त्याच प्रकारचे घडले आहे. एका खासगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता प्रशासन यासाठी काय खबरदारी घेणार याकडे सिडकोवासीयांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक व परिसरात संसर्ग वाढत असताना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारानेही धास्ती निर्माण केली आहे. नाक, घसा तज्ज्ञाकडे रोज चार-पाच रुगण उपचारासाठी येत आहे. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची आरोग्य यंत्रणेने गंभीर दखल घेतली असून, शहरात या रुग्णांचे ट्रेसिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोळ्यासारखा महत्त्वाचा अवयवही निकामी होत आहे. जुने सिडको भागातील युवकाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. यात एचआरसीटी स्कोर वाढला होता. शहरातील खासगी रुग्णालयातून उपचार झाल्यानंतर पंधरा दिवसांनंतर त्याने कोरोनावर मात केली. मात्र काही दिवसातच या रुग्णाच्या एका डोळ्याची संवेदना नष्ट झाली. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले व शस्त्रक्रिया करून निकामी झालेला डोळा काढून टाकण्यात आला. त्यानंतरही त्रास झाल्याने शहरातील तिसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, काही दात काढणार असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. सिडकोसारख्या भागात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा रुग्ण आढळल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.रुग्णालयात उपचार सुरुया रुग्णाने कोरोनावर मात केली असली तरी त्याचा एक डोळा या आजारामुळे काढून टाकावा लागला आहे आणि अजूनही संबंधित रुग्णावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सिडको हा दाट वस्तीचा भाग असल्याने या ठिकाणी अशा संसर्गाचा प्रसार ताबडतोब होऊ शकतो त्यामुळे आता नागरिकांनी याची खबरदारी घेऊन स्वतःबरोबरच इतरांचेही रक्षण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सिडकोतील शिवाजी चौक परिसरात अशा प्रकारचा रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
सिडकोत म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 1:17 AM
कोरोनाच्या महामारीतून हळूहळू बाहेर येत असतानाच आता म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण सिडको परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर हा आजार होत असल्याचे सांगितले जात असून, या रुग्णाच्या बाबतीतही सर्वच प्रकार त्याच प्रकारचे घडले आहे. एका खासगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता प्रशासन यासाठी काय खबरदारी घेणार याकडे सिडकोवासीयांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देकोरोनामुक्तीनंतरही संकट : उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष