नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या यादीत संधी मिळालेल्या १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी मंगळवारी (दि.१६) पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत संपेपर्यंत ८ हजार १७० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज रद्द केले व २६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले, तर हजार ६४७ विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी प्रवेशासाठी संपर्कच साधला नसल्याची माहीती शिक्षण विभागाने दिली.ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशांची संधी मिळू शकली नाही, त्यांना बुधवारी व गुरुवारी त्यांच्या आॅनलाइन अर्जात फेरबदल करता येणार असून, त्यानंतर २२ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.अकरावीच्या प्रवेशप्र्रक्रियेत आतापर्यंत पहिल्या यादीत विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ८हजार १७० विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले असून, यात कला शाखेतील १५८९, वाणिज्याच्या तीन हजार ६४, विज्ञानाच्या तीन हजार ९१९ व एमसीव्हीसीच्या १९९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत कला शाखेतील दोन हजार ५६३, वाणिज्य शाखेच्या ५ हजार ६२९, तर विज्ञान शाखेच्या ६ हजार ३९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नसल्याने दुसऱ्या फेरीसाठी प्रतीक्षा करणाºया विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
पहिल्या फेरीत अकरावीचे आठ हजार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:52 AM