शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ‘बॉर्डर विंग’चे जवान तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:17 AM

विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ‘बॉर्डर विंग’ म्हणजेच सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांची मदत घेतली असून, नाशिक शहरातील संवेदनशील मतदान केंद्राची जबाबदारी या जवानांवर सोपविण्यात आली आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ‘बॉर्डर विंग’ म्हणजेच सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांची मदत घेतली असून, नाशिक शहरातील संवेदनशील मतदान केंद्राची जबाबदारी या जवानांवर सोपविण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून नाशकात दाखल झालेल्या या जवानांकडून प्रत्येक मतदान केंद्राची रेकी करण्यात येऊन तसा बंदोबस्ताचा आराखडा तयार करण्यात आला.भारत-पाकिस्तानच्या गुजरात नजीकच्या सीमेवर तैनात असलेल्या बॉर्डर विंगच्या सुमारे १७०० जवानांची यंदा पहिल्यांदाच महाराष्टÑाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मदत घेण्यात आली आहे.  राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या राज्यातील काही ठराविक मतदारसंघातच या जवानांना तैनात करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेऊन बंदोबस्ताची रूपरेषा ठरविली होती. नाशिक शहरात बॉर्डर विंगचे तीनशे जवान तैनात करण्यात आले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या जवानांचे नाशकात आगमन झाले असून, संवेदनशील मतदान केंद्रावर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक