घोटी : खैरगाव ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदा पदवीधर थेट सरपंच निवडून आल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील तिन्ही गटाच्या उमेदवारांना नाकारून ग्रामस्थांनी थेट सरपंच म्हणून अॅड. मारु ती रामभाऊ आघाण यांना निवडून दिले. युवाशक्तीच्या ताकदीने गावाचा चेहरामोहरा बदलवणार असल्याचे आघाण यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यातील खैरगाव हे संपूर्ण गाव आदिवासी समाजाचे आहे. गावात यापूर्वी अशिक्षित लोकप्रतिनिधींनी गावाची धुरा सांभाळलेली आहे. मात्र हे गाव विकासापासून कोसो दूर होते. गावाच्या शाश्वत विकासासाठी खैरगाव ग्रामस्थांनी तिन्ही गटाच्या उमेदवारांना नाकारून कुठल्याही गटाचे नसलेल्या आघाण यांना थेट सरपंचपदी विराजमान केले. खैरगाव गावात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता भरीव ग्रामविकास साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महेश परदेशी, कावजी भले, गोरख मदगे, आनंद राजपुत, नामदेव भले, संपत आघाण, आकाश गिर्हे, आनंदा आघाण, एकनाथ तोकडे, लक्ष्मण दालभगत, काशिनाथ दालभगत, सोपान जाखेरे, सोमनाथ फोडसे, जगन आघाण, राजु आगीवले, सोमनाथ आघाण, प्रल्हाद तोकडे, काळु रेरे, अर्जुन शिद, खंडु आघाण, भाऊ शिद, जालिंदर रेरे, उत्तम मदगे, गांगड आदींनी प्रयत्न करून अॅड. मारु ती रामभाऊ आघाण उपस्थित होते.
खैरगावला लाभले प्रथमच पदवीधर सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 2:16 PM