शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

नाशकात प्रथमच रानगव्याने दिले दर्शन; कुतूहल अन् घबराहट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 2:55 PM

वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील यांच्यासह तत्काळ प्रतिसाद पथकाने परिसर गाठला. यावेळी शेतमळ्याच्या परिसरातून भटकंती करत असलेल्या रानगव्याला वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. हा गवा वाट चुकल्याने पाथर्डी शिवारात आल्याचे वन अधिका-यांनी सांगितले.

ठळक मुद्देवन्यप्राण्याचे अजस्त्र रुप पाहून धक्का बसलानागरिकांमध्ये हा कुतुहलाचा व काहीसा भीतीचा विषय ठरलारानगवा हा स्वभावाने शांत वन्यप्राणी

इंदिरानगर : अजस्त्र असा शाकाहारी वन्यप्राणी रानगवा भारतात आढळतो. नाशिक शहराजवळच्या पाथर्डी गावाच्या शिवारात चक्क रानगव्याने ग्रामस्थांना दर्शन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाथर्डी गावाच्या परिसरातून नागरीवस्तीकडे गवा येत असल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहिती मिळाल्याने वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन सैन्यदलाच्या जंगलाच्या दिशेने गव्याला पिटाळले.याबाबत वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी (दि.२८) दुपारी बारा वाजेच्या सुमारास रानगवा आढळून आल्याने प्रथमदर्शनी नागरिकांमध्ये घबराट पसरली. रेड्यासमान अजस्त्र भारदार शरीराचा प्राणी भटकत असल्याचे काही गावक-यांना दिसले. त्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील यांच्यासह तत्काळ प्रतिसाद पथकाने परिसर गाठला. यावेळी शेतमळ्याच्या परिसरातून भटकंती करत असलेल्या रानगव्याला वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. हा गवा वाट चुकल्याने पाथर्डी शिवारात आल्याचे वन अधिका-यांनी सांगितले.

जाचक मळा येथील श्यामदर्शन व शिवपॅलेस या परिसरात रानगवा फेरफटका मारताना आढळून आला. सर्वप्रथम नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले;मात्र काही नागरिकांना त्या वन्यप्राण्याचे अजस्त्र रुप पाहून धक्का बसला. एवढा मोठा प्राणी अचानकपणे परिसरात अवतरल्याने नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली. आतापर्यंत बिबट्या या भागात दर्शन देत होता; मात्र यासोबतच रानगव्यासारख्या वन्यप्राण्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये हा कुतुहलाचा व काहीसा भीतीचा विषय ठरला. रानगवा हा स्वभावाने शांत वन्यप्राणी असल्यामुळे नागरिकांनी हेतूपुरस्सर त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करु नये, त्या प्राण्यापासून नागरिकांना तसा कुठलाही धोका नसल्याचे पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी सांगितले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागNashikनाशिक