नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्व दूर लावलेली हजेरी व पाठोपाठ मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांत चांगलेच झोडपून काढल्याने अवघ्या काही दिवसांतच जून महिन्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास १२ टक्के पर्जन्यवृष्टी पहिल्याच आठवड्यात झाली आहे. विशेष म्हणजे समाधानाची बाब म्हणून दुष्काळी ओळखल्या जाणाºया मालेगाव, बागलाण, देवळा व सिन्नर तालुक्यांत तर या पावसाने जूनची सरासरीदेखील ओलांडली आहे.नाशिक जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १५,००४ मिलीमीटर इतकी असून, त्यात जून महिन्याचे प्रमाण २७०४ मिलीमीटर इतके आहे. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्याअखेर जिल्ह्यात फक्त १ टक्काच पाऊस झाला होता. यंदा मात्र हेच प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतर मान्सूनच्या आगमनाकडे साºयांचे लक्ष लागून होते. तथापि, गुरुवार व शुक्रवारी पावसाने मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली आणि नाशिक, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेवर, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, सिन्नर, येवला या तालुक्यांना जोरदार हजेरी लावली.गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २१५ मिलीमीटर पाऊस झाला. जून महिन्याच्या सरासरीच्या १२ टक्के पाऊस नोंदविला गेला. या पावसामुळे मालेगावला ११४, बागलाणला १३८, देवळा १२२, सिन्नरला १२१ टक्के पाऊस झाला आहे. हे सारे तालुके कायम दुष्काळी म्हणून ओेळखले गेले आहेत. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदविला गेल्याने. शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.-----------------पावसाचे पाणी सोडून देण्याची वेळशुक्रवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वर व धरण परिसरात झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. त्यातच दारणा धरण क्षेत्रातील पाणीही थेट नदीत येऊन मिसळल्याने गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. अशातच नांदूरमधमेश्वर बंधाºयात अगोदरपासूनच १०० टक्के पाणीसाठा असल्यामुळे शुक्रवारी रात्री ९ ते शनिवारी पहाटे ६ वाजेपर्यंत जवळपास तीनशेहून अधिक क्यूसेक पाणी सोडून देण्यात आले. हे पाणी पुढे नगर जिल्ह्याकडे झेपावले.
जूनच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात १२ टक्के पर्जन्यवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:27 PM