बोरगाव : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेले बोरगाव येथील पाझर तलावाने तळ गाठल्याने परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.गेली तीस वर्षे सतत पाणी उपलब्ध असणाऱ्या तलावात पाणी नसणे यावरून परिसरातील दुष्काळसदृश स्थिती लक्षात येते. काही दिवसांनी बोरगाव, घोडाबे गावकऱ्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बोरगावच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासन पाण्याचे स्रोत मोठे करण्याचे प्रयत्न करत आहे.पण आज उपलब्ध असलेले स्रोत पुरेसे नाही. ग्रामपंचायतकडून जुन्या विहिरीची खोली वाढविण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने तलावातील गाळ काढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घाटमाथ्यावरील पाझर तलाव कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 6:14 PM