नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकीचोरांनी नागरिकांच्या घराजवळून दुचाकी चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. जुने नाशिक, गोदाघाट, दत्तमंदीर, जयभवानीरोड या भागातून चोरट्यांनी वेगवेगळ्या दुचाकी गायब केल्याचे उघडकीस आले आहे. गोदाघाट परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रीय असल्याच्या तक्रारी येत आहेत. या भागातून सातत्याने दुचाकी लांबविल्या जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.दुचाकी चोरांनी पुन्हा शहरात हैदोस घालण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांकडून सातत्याने दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या जात असल्या तरी दुचाकी चोरीचे गुन्हे थांबता थांबत नसल्याने पोलिस प्रशासनही चक्रावले आहे. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावरून विजय चिंधा पवार (५९, रा.अशोकनगर) यांनी त्यांची स्पलेंडर दुचाकी (एम.एच.१५ बीबी ५८१९) उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने दुचाकीचे हॅन्डल लॉक तोडून चोरट्यांनी दुचाकी पळविली. दोन दिवसांपुर्वी याच परिसरातून अतुल मोकाशी यांच्या मालकीची लाल रंगाची बजाज प्लॅटिना दुचाकी (एम.एच १५ टीई ६४२७)चोरट्यांनी अशाच पध्दतीने लंपास केली.दुसऱ्या घटनेत भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागवानपुरा भागातील रहिवाशी अबुतआला खलिफा (१९) या युवकाने त्याच्या घराजवळ उभी केलेली अॅक्टिवा (एम.एच.१५ एचबी १४९६) अज्ञात चोरट्याने लंपास केली. खलिफा यांच्या फिर्यादीवरून ५९ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीसºया घटनेत उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्नेहबंधन कॉलनी, दत्तमंदीर येथे राहणारे राहूल चंद्रकांत म्हसे यांची अॅक्टिवा दुचाकी (एम.एच१५ जीक्यू ४७३७) अज्ञात चोरट्यांनी गायब केली. त्यांच्या फिर्यादीवरून ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरीचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. चौथ्या घटनेत नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीतून राहुल राजकुमार गोते (२६,रा.विद्याविहार सोसा.जयभवानीरोड) यांच्या मालकीची बजाज डिस्कव्हर दुचाकी (एम.एच.१५ ईआर ५३५८) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनांमध्ये सुमारे सुमारे दीड लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी वाहनांच्या स्वरूपात लुटल्याचे समोर आले आहे.
शहरातून दीड लाखांच्या पाच दुचाकी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 8:44 PM
गोदाघाट परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रीय असल्याच्या तक्रारी येत आहेत. या भागातून सातत्याने दुचाकी लांबविल्या जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देदुचाकी चोरांचा पुन्हा शहरात हैदोस सातत्याने दुचाकी लांबविल्या जात असल्याने तीव्र नाराजी