नाशिक : जेलरोड येथे चोरट्यांनी केलेल्या एका घरफोडीत साडेपाच हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. जेलरोवरील अयोध्यानगर येथील रहिवाशी डॉ. विजय चंद्रकांत शहाणे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करत ४ हजारांची रोकड व दहा ग्रॅम वजनाची चांदीची देवतेची मूर्ती लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीत साडेपाच हजारांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 1:21 AM