नाशिक : शहरासह जिल्ह्यातून गणेश बाळू तपळपाडे या भामट्याकडून भद्रकाली पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत़ हस्तगत करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत दीड लाख रुपये इतकी आहे़ संशयित तपळपाडे हा शुक्रवारी (दि़११) सायंकाळच्या सुमारास शालिमार परिसरात दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने शालिमार परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले़ पोलिसांच्या चौकशीमध्ये इगतपुरी आडगावसह जिल्ह्याच्या विविध ठिकाणांहून पाच दुचाकी चोरल्याची कबुली संशयित तपळपाडे याने दिली असून, त्याने चोरलेल्या पाच दुचाकी अकोला तालुक्यातील सांगवी येथून जप्त करण्यात आल्या आहेत़ (प्रतिनिधी)
चोरीच्या पाच दुचाकी जप्त
By admin | Published: March 12, 2016 11:30 PM