सिडको : अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) वार्षिक निवडणुकीत रविवारी (दि.२९) अर्ज माघारीच्या दिवशी ५९ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून निवडणुकीत २४ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहे. अंतिम यादी सोमवारी (दि.३०) नोटीस बोर्डवर लावण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मधुकर ब्राह्मणकर व राजकुमार ज्वाली यांनी दिली.आयमा निवडणुकीत मागील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन अधिकारी मधुकर ब्राह्मणकर व राजुकमार ज्वाली हे निवडणुकीचे कामकाज पाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत असल्याने या निवडणुकीकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी गटाचे सरचिटणीस पदाचे उमेदवार निखिल पांचाळ यांचा याआधीच अर्ज बाद केल्याने विरोधी गटाचे सरचिटणीसपदाचे उमेदवार क ैलास अहेर यांची बिनविरोध निवड होणे शक्य आहे. निवडणुकीत २४ जागांसाठी ५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, यापैकी आज अर्ज माघारीच्या दिवशी पाच उमेदवारंनी माघार घेतली. यात सत्ताधारी गटाचे उमेश कोठावदे हे बाहेरगावी असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज ग्राह्य धरला होता. आज अर्ज माघारीच्या दिवशी कोठावदे यांनी माघार घेतल्याने या वादावर पडदा पडला आहे.कोठावदे यांच्यासह अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले प्रकाश ब्राह्मणकर, नेहा मैसपूरकर, प्रसाद जाधव, निरज बदलाणी या पाच उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. येत्या दि. ५ जून रोजी मतदान व ६ जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक अधिकारी ब्राह्मणकर यांनी सांगितले. (वार्ताहर)
पाच उमेदवारांनी घेतली माघार
By admin | Published: May 29, 2016 10:59 PM