दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह पाच नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.१४) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे दिंडोरी येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. भाजपात दाखल झालेल्यांमध्ये शिवसेना व काँग्रेसचा प्रत्येकी एक, तर तीन अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.दिंडोरी नगरपंचायतीत तीन महिन्यांपूर्वी राजकीय उलथापालथ होत काँग्रेसचे प्रथम नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी शिवसेनेचे प्रमोद देशमुख यांना साथ दिली होती. त्यामुळे देशमुख यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती, तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आशा कराटे यांची निवड करण्यात आली होती. नगराध्यक्षपदाची प्रथम अडीच वर्षे टर्म संपून आता नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाले आहे. सदर निवडीचा कार्यक्र म जाहीर झाला असून, २५ जुलै रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा राजकीय उलथापालथ झाल्याची चर्चा रंगत असताना शिवसेनेचे नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष आशा कराटे यांच्यासह अपक्ष तुषार वाघमारे, निर्मला जाधव, सविता देशमुख तसेच स्वीकृत नगरसेवक नीलेश गायकवाड यांनी पालकमंत्री गिरीश महाजन व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करत धक्का दिला आहे. यावेळी कादवाचे माजी संचालक दत्तात्रेय जाधव, काका देशमुख, भास्कर कराटे, साजन पगारे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय कावळे, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बर्डे, तुकाराम जोंधळे, श्याम मुरकुटे, श्याम बोडके, माजी मनीषा बोडके, नगरसेवक रोहिणी पगारे आदी उपस्थित होते़राजकीय समीकरणे बदलणारबदलत्या राजकीय समीकरणांत आता दिंडोरी नगरपंचायतीमध्ये भाजपाचे सहा नगरसेवक झाले आहेत. काँग्रेसकडे सहा, राष्ट्रवादीकडे तीन, तर शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. दरम्यान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर शहर विकास आघाडीने खेळलेल्या या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा व कोण होणार यांची उत्सुकता लागली आहे.
दिंडोरीच्या नगराध्यक्षांसह पाच नगरसेवक भाजपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:05 AM
दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह पाच नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.१४) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे दिंडोरी येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. भाजपात दाखल झालेल्यांमध्ये शिवसेना व काँग्रेसचा प्रत्येकी एक, तर तीन अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.
ठळक मुद्देशिवसेना, कॉँग्रेसला झटका