ठळक मुद्देशहरातील संपूर्ण व्यवहार बंद
अभोणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अभोणा शहरात मंगळवारपासून ( दि.८ते१३) रविवार पर्यंत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून या काळात शहरातील संपूर्ण व्यवहार बंद असणार आहेत.सदरचा निर्णय विविध व्यवसाय करणारे व्यापारी, सामाजिक कार्यकर्तें, ग्रामस्थ व ग्रामपालिका यांच्या समन्वयातून घेण्यात आला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा औषध दुकाने, दवाखाने, दुधपुरवठा यासेवा सुरु असतील. नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.