नाशिक : राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौºयावर येत असून, पाच दिवस त्यांचा नाशिकमध्ये मुक्काम असणार आहे. भागवत हे बुधवारी (दि.२०) नागपूर येथून रेल्वेने नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. सदर दौरा खासगी असून, शहरातील काही कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत.राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दौºयाची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. भागवत यांना झेड दर्जाची सिक्युरिटी असल्याने त्यांच्या आगमन आणि मुक्कामाची जबाबदारी पोलीस आणि जिल्हा प्रशासन पार पाडणार आहेत. दि. २० रोजी भागवत हे दुपारी २ वाजता नागपूरहून नाशिकसाठी रवाना होतील. दुसºया दिवशी दुपारी १२.३० वाजता त्यांचे नाशिकरोड स्थानकात आगमन होणार आहे. या खासगी दौºयात भागवत हे सातपूर येथील एका आप्तेष्टांकडे उतरणार आहेत. दुसºया दिवशी दि. २१ रोजी सायंकाळी ५ वाजता कृषीनगर येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ५.३० वाजता गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुल येथील कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २२ ते २४ दरम्यान मोहन भागवत हे शहरातील काही आप्तेष्टांच्या भेटी घेणार आहेत. दि. २४ रोजी ते रेल्वेने पुन्हा नागपूरकडे प्रयाण करणार आहेत. राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती असल्याने त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी शहर पोलिसांवर असून, जिल्हा प्रशासनाने भागवत यांच्या दौºयाची तयारी सुरू केली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी भागवत यांच्या दौºयाचा आढावा घेतला.
सरसंघचालक पाच दिवस नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:38 AM