निफाड : नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने गोदावरी ,दारणा कादवा, बाणगंगा नद्यांना आलेले पुराचे पाण्याने कोरड्याठाक नांदुरमध्यमेश्वर धरणाला रविवारी रात्रीतुन काठोकाठ भरविले आहे धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असुन गोदापात्रात व नांदूरमध्यमेश्वर बंधार्याच्या उजव्या डाव्या कालव्यातुन साडेचवदा हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता अरषान शेख यांनी सांगितलेगेल्या तीन दिवसांपासुन नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रासह सर्वत्र झालेल्या संततधार पावसाने गोदावरी दारणा नद्या दुथडी भरु न वाहु लागल्या आहेत बाणगंगा नदीलाही पुर आला पालखेड धरणक्षेत्रात झालेल्या पावसाने पालखेड धरणातुन कादवा पात्रात पाणी सोडण्यात आले आहे निफाड शहराला पाणीपुरवठा करणारा तलावदेखील कादवेच्या पुराने ओसंडुन वाहु लागला आहे कादवा गोदावरी निदच्या संगमावरील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे धरणाच्या पाण्याचा फुग गोदाकाठाच्या गावांमध्ये शिरण्याचा धोका होऊ नये म्हणुन। नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात तयार करण्यात आलेले दरवाजे पाणी पातळी वाढताच उघडले जातात रविवारी मध्यारात्रीपासुन नांदुरमधमेश्वर धरणात पाणीपातळी वाढली होती नांदुरमधमेश्वर धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते उजवा व डाव्या कालव्यातुनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे सोमवार दिवसभर पुरपाण्याचा वेग व पातळी ओसरत गेली नांदुरमधमेश्वर धरणातुन साडेचवदा हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे या पाण्याने तामसवाडी खेडलेझुंगे कानळद आदी ठिकाणचे पाणीसाठवण बंधारे भरु न गोदावरी खळखळुन वाहत आहे दरम्यान निफाडला सोमवार सायंकाळपर्यंत एकुण 243 मिमि पावसाची नोंद झाली आहे दरम्यान या संततधार पावसामुळे पुढील पेरण्यांना वेग येणार आहे. (वार्ताहर)
नांदूरमधमेश्वर धरणाचे पाच दरवाजे उघडले
By admin | Published: July 12, 2016 12:02 AM