मनमाड (नाशिक) : धावत्या प्रवासी रेल्वे गाडीतून गांजा,सोने आणि मौल्यवान वस्तूंची तस्करी होत असल्याचे यापूर्वी अनेक वेळा उघड झाले असतानाच प्रवासी रेल्वे गाडीतून चक्क मानवी तस्करी करणाऱ्या पाच इसमांना स्वयंसेवी संस्थेच्या गुप्त माहितीच्या आधारे आणि मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ताब्यात घेण्यात आले असून ८ ते १५ वयोगटातील ५९ मुलांची सुटका करण्यात आले.
सध्या देशभरात लहान मुलांचे तस्करीचे अनेक प्रकार समोर आले असतानाच बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील ५९ मुलांना मदरशाच्या वेशात गाडी क्रं.०१०४० दानापुर - पुणे एक्सप्रेसने प्रवास करत असल्याचे माहिती एका स्वयंसेवी संस्थेने गुप्त माहिती मध्य रेल्वे सुरक्षा यंत्रणेला दिली.या माहितीचा आधारे भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस यांनी भुसावळ स्थानकात दानापुर - पुणे एक्सप्रेस आल्यानंतर गाडीची कसून तपासणी केली असता जळगाव येथे ८ ते १५ वयोगटातील २९ मुलांना आणि तस्करी करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले.दरम्यान अजून काही मुलं असल्याचा सुरक्षारक्षकांना संशयालयाने धावत्या गाडीत पुन्हा कसून तपास मोहीम केली असता ८ ते १५ वयोगटातील ३० मुल आढळून आली आणि तस्करी करणाऱ्या ४ इसमाला मनमाड स्थानकादरम्यान ताब्यात घेतले. याप्रकरणी भुसावळ आणि मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात मानवी तस्करी अंतर्गत भादवी ३७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मुलांना बाल निरीक्षक गृह येथे ठेवण्यात आले आहे.
मानवी तस्करी करणाऱ्या एका इसमाला भुसावळ येथे अटक तर चार इसमांना मनमाड येथे अटक तर ५९ मुलांची सुटका
२८ मे रोजी सायंकाळी सहा वाजता दानापूर रेल्वे स्थानकातून पुण्याकडे येणाऱ्या - दानापूर पुणे एक्सप्रेस मध्ये ५९ मुलांची तस्करी केले जात असल्याची माहिती स्वयंसेवी संस्थेने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती दिली या माहितीच्या आधारे भुसावळ रेल्वे स्थानकात मानवी तस्करी करणाऱ्या मोहम्मद अंजर आलम वय ३४ आणि मनमाड रेल्वे स्थानकात सद्दाम हुसेन सिद्दकी वय २३, नौमान सिद्दकी वय २८, एजाज सिद्दकी वय ४०, मोहम्मद शहा नवाज वय २२ सर्व बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील रहवासी आहेत. या कारवाईमुळे बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील भुसावळ स्थानकात २९ मुलांची आणि मनमाड स्थानकात ३० मुलांची सुटका झाली.
तस्करी होत असताना मुलांची परिस्थिती
प्रवासादरम्यान पोटात अन्नाचा दाणा नाही तर पिण्याचे पाणी देखील नाही अशा व्याकुळलेल्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाला लहान मुले आढळून आली तत्काळ त्यांची परिस्थिती बघून प्रशासनाने त्यांचे खाणे पिण्याचे व्यवस्था करून बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्या भयभीत झालेल्या मुलांना जळगाव आणि नासिक येथील बालनिरीक्षक गृह येथे रवाना करण्यात आले.
कारवाई कशी झाली
मुलांची तस्करी होत असल्याचा संशय आल्याने पाच जणांना सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपुस केली असता पुण्याहून सांगलीला जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान सुरक्षारक्षकांनी मुलांचे कागदपत्र मागितले असता त्यांच्याकडे कोणतेही वैद्य पुरावा आढळून आले नाही.यामुळे मुलांची तस्करी होत असल्याचे उघड झाले. मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता १२ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख डॉ शिवराज मानसपुरे, भुसावळचे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राधाकिसन मीना, लोहमार्ग पोलीस निरीक्षक विजय गेराडे आणि मनमाड रेल्वे सुरक्षा बलाचे संदीप देसवाल,लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आदि रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी व लोहमार्ग पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.