चांदवड - चांदवड येथील शासकीय विश्रामगृह येथे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन व आर्थिक मदतीसाठी सहविचार सभेचे आयोजन केले .अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल अहेर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल,प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक,सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, सुनील शेलार , रोर्इंग पट्टू दत्तु भोकनळ,चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील,वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके ,उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, कृउबाचे उपसभापती नितीन अहेर, रावसाहेब भालेराव, का.भा. अहेर, जगन्नाथ राऊत, सुनील कबाडे , विलास ढोमसे व विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक भोसले यांनी केले.यावेळी दत्तु भोकनळला पुढील खेळांसाठी प्रोत्साहन व आर्थिक मदतीसाठी सर्व अधिकारी, सेवाभावी संस्था, बॅका, पतसंस्थांनी पुढे येऊन मदत करावी आगामी आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी दत्तु भोकनळ यास मदत करावी असे आवाहन आमदार डॉ. राहुल अहेर, व शिरीषकुमार कोतवाल यांनी केले.
दत्तु भोकनळला पुढील सरावासाठी पाच लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 3:50 PM
चांदवड - चांदवड येथील शासकीय विश्रामगृह येथे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन व आर्थिक मदतीसाठी सहविचार सभेचे आयोजन केले .
ठळक मुद्देबैठकीस मनोज शिंदे, प्रभाकर ठाकरे,सुनील डुंगरवाल, विशाल ललवाणी, कासलीवाल, बाळासाहेब वाघ, शांताराम ठाकरे, गटविकास अधिकारी महेश पाटीलया, बी.टी.चव्हाण, शासकीय अधिकारी , पदाधिकारी उपस्थित होते.