त्र्यंबकेश्वर : सिंहस्थाची शेवटची आणि अंतिम पर्वणी पार पडल्यानंतर शनिवारी त्र्यंबकमधील पाच अखाड्यांनी आखाड्याचे ध्वजावतरण केले. ध्वजारोहण झाल्यानंतर साधु-महात्मा आपापल्या ठिकाणी प्रस्थान करतात.त्र्यंबकमधील उदासिन बडा, उदासिन नया, निर्मल पंचायती अखाडा, श्री शंभू पंचायती अटल अखाडा, श्री पंचायती आनंद अखाडा आदी अखाड्यांचे ध्वजावतरण शनिवारी झाले. या अखाड्यांनी सर्व प्रथम ध्वजांचे पारंपारिक पूजन केले. त्यानंतर सावकाशपणे ध्वजाचा खांब उतरविण्यात आला. यंदा वादळ-वारे वगैरे मोठ्या प्रमाणात नव्हते. फक्त १/२ वेळा जोरदार पावसाने सलामी दिली. त्यामुळे ध्वजाचे कापड फाटले नाही. कापड फाटल्यास अशा ध्वजाचे कापड गंगेत अर्पण करतात. दरम्यान ध्वजा उतरविल्यानंतर आखाड्यातील साधु-महात्मांना कढी-पकोड्याचे भोजन दिले जाते. त्र्यंबक मधील या पाच अखाड्यात ध्वजावतरण कढी-पकोडा झाले असले तरी साधू-महंतांनी त्र्यंबकेश्वर सोडले नाही. सिंहस्थासाठी अखाड्याच्या विरहीत जे साधू आलेले असतात, त्यांनी बसमध्ये, ट्रकमध्ये जशी जागा मिळेल तशी त्यांची जाण्याची घाई झाली आहे. (वार्ताहर)
त्र्यंबकमधील पाच आखाड्यांचे ध्वजावतरण
By admin | Published: September 26, 2015 11:27 PM