कसबे सुकेणे : सन २०१२-१६साठी झालेल्या निवडणुकीतील खर्च सादर न केल्याने कसबे सुकेणेचे विद्यमान सरपंच आणि उपसरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यपद रद्द करून पुढील पाच वर्षे त्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्याचा निकाल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.कसबे सुकेणे येथील आनंदराव गोपाळराव भंडारे यांनी तक्र ार दाखल केली होती. विद्यमान सरपंच छगन जाधव, उपसरपंच परेश भार्गवे, सदस्य अनुपमा जाधव, रेखा जाधव, मीराबाई काठे, आशा काळे, जिजाबाई भंडारे यांचे सदस्यपद रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. दरम्यान, या निर्णयाचे आदेश कसबे सुकेणे ग्रामपालिकेला तहसीलकडून प्राप्त झाले असल्याची माहीती गुरुवारी कसबे सुकेणेचे ग्रामविकास अधिकारी एस.व्ही.गायकवाड यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालाची अधिकृत प्रत अद्याप मिळाली नसून अपात्र ठरविण्याचा निर्णय दुदैवी आहे.याबाबत आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.-बाळासाहेब जाधव, संचालक ,निसाका
या सदस्यांनी खर्च तहसीलला सादर केलाच नव्हता, पुरावे तक्र ारीला जोडले होते. त्यामुळे हा निकाल अपेक्षित होता.
- आनंदराव भंडारे, तक्र ारकर्ते