नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या नमुन्यांचे अहवाल पाहता, जिल्ह्यातील ४७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असताना सायंकाळी मालेगाव येथे आणखी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. दरम्यान, निफाड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आलेले असताना त्याच गावातील एका संशयिताचा व त्याचबरोबर एका गर्भवती महिलेचाही मृत्यू झाल्याची घटना घडल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागली आहे.मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात मालेगावच्या पाच संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आठवडाभरापासून मालेगावमधून रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात मालेगाव सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला असून, जिल्ह्यातील इतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्हा रुग्णालयाला ५२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये मालेगावच्या ५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ४७ रुग्णांचा अहवाल निगेटिह आला आहे. मंगळवार रात्रीपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालांनी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर घातली असून, गामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखावा, असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे.दरम्यान, जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्याने मंगळवारी सकाळी त्याला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घरी सोडण्यात आले, त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयास दिवसभरातून ४७ अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला. त्याचबरोबर कोरोनाबाधित म्हणून उपचार घेणाºया नाशिक शहरातील रुग्णासह काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त केले आहे.कोरोना संशयिताचा मृत्यूनिफाड तालुक्यातील एका मध्यमवयीन नागरिकास सोमवारी आजारपणाच्या संशयावरून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मात्र त्याचा तपासणी अहवाल मिळालेला नसल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. या रुग्णाच्या प्राथमिक तपासणीत सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.मयत महिला बाधितधुळ्याच्या रुग्णालयात तीन दिवसांपूर्वीच निधन झालेल्या मालेगावच्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले आहे. याचदरम्यान, मंगळवारी मालेगावमध्ये एका गर्भवती महिलेचे निधन झाल्याचे वृत्त असून, मृत्यूनंतर तिचे नमुने घेण्यात आल्याचे व त्याचा अहवाल दोन दिवसांनी मिळणार असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
मालेगावात आणखी पाच कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:49 PM
नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या नमुन्यांचे अहवाल पाहता, जिल्ह्यातील ४७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असताना सायंकाळी मालेगाव येथे आणखी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ वर पोहोचली आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यातील संख्या ४२ : दिवसभरात ४७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह