पोलिसांनी त्यांच्याकडून दोन तलवार, चाकू, गावठी कट्टे, पिस्टल, गुन्ह्यात वापरलेले पाच भ्रमणध्वनी असा ६ लाख ४० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी अगोदर अटक केलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीवरून व पोलिसांनी घेतलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे या प्रकरणातील संशयित सुरत येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय महाजन, सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार, राजेंद्र पाटील, आहेर, गायकर आदींनी सापळा रचून सुरत येथून शेख सईद शेख रफिक ऊर्फ गांजावाला, मसूद खान कमाल खान ऊर्फ मसूद गांजावाला, फिरोज अहमद अली मोहम्मद ऊर्फ फिरोज गांजावाला, शेख जाहिद शेख आबीद ऊर्फ जाहिद गांजावाला, शेख मोईन शेख जब्बार ऊर्फ मोईन काल्या यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवार( दि.२२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इन्फो
गुन्ह्याची कबुली
जुना आग्रा रोडवरील ताज हॉटेलच्या पाठीमागे इब्राहिम खान इस्माईल खान यांच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने इम्रान शहा गफ्फार शहा, इसतीयाक अहमद मो. मुस्तफा, सय्यद दानिश इस्माईल सय्यद इस्माईल, अब्दुल हसिम इकबाल मोहम्मद, मोहम्मद सलमान मोहम्मद सलीम या पाच जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.