नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील संज्योत मेटल इंडस्ट्रीत सीटूची युनियन लागू करावी तसेच विविध मागण्यांसाठी संपावर असताना कंपनीचे मालक संतोष हेगडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी शुक्रवारी (दि़ २९) पाच वर्षे सक्तमजुरी, तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली़ २१ मार्च २०१२ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात १६ कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी सबळ पुरावे सादर केले होते़सातपूर औद्योगिक वसाहतीतील संज्योत मेटल इंडस्ट्रीमध्ये आरोपी मधुकर दौलत कुंभार्डे, यशवंत हरी रोकडे, परेश दत्तात्रय सोनार, प्रशांत ऊर्फ परशराम मुन्नुस्वामी नायडू, विजय विश्राम उमाडे व लालमोहर रामजी यादव हे सीटू युनियनचे सभासद व कंपनीतील कायमस्वरूपी व कंत्राटी कामगार होते़ कंपनीत सीटूची युनियन लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी आरोपी १७ नोव्हेंबर २०११ पासून संपावर होते़ २१ मार्च २०१२ रोजी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास कंपनीचे मालक संतोष हेगडे हे ज्योती सिरॅमिक कंपनीसमोरील रोडने कारमधून येत असताना दुचाकीवरील आरोपींनी त्यांना अडविले व कारमधून खाली खेचले़ यानंतर लोखंडी पाइप, लोखंडी गज, लाकडी स्टम्पने जबर मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ या मारहाणीमध्ये हेगडे यांच्या दोन्ही पायांचे व डाव्या हाताचे हाड मोडले होते़ तसेच कारच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले होते़सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपरे (सद्यस्थितीत नेमणूक नवी मुंबई) यांनी करून ३१ मे २०१२ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ न्यायाधीश नंदेश्वर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी साक्षीदारांची साक्ष तसेच सबळ पुरावे सादर केले़ या पुराव्यामुळे न्यायालयाने आरोपी मधुकर कुंभार्डे, यशवंत रोकडे, परेश सोनार, प्रशांत ऊर्फ परशराम नायडू, विजय उमाडे व लालमोहर यादव यांना भादंवि कलम ३२६ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ दरम्यान,न्यायालयात गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीने सातपूर पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी पोलीस हवालदार पी़व्ही़ पाटील, कोर्ट कर्मचारी महिला पोलीस नाईक पी़ व्ही़ अंबादे, पोलीस नाईक संतोष गोसावी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला़सहा महिने साध्या कैदेची शिक्षासंतोष हेगडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाºया पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी शुक्रवारी (दि़ २९) पाच वर्षे सक्तमजुरी, तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली़ २१ मार्च २०१२ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात १६ कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़