नाशिक :देवळाली कॅम्प परिसरातील हाडोला भागात गुंडाकडून दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणी आयुक्तालयाकडून गंभीर दखल घेत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील पाच पोलीसांना सोमवारी रात्री उशिरा उपआयुक्त विजय खरात यांनी निलंबित केले.यामध्ये दोन हवालदार व तीन शिपाई यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे, असे खरात यांनी सांगितले.हाडोळा येथे राहणा-या यश पवार उर्फ बिट्टू याच्यावर सनी कदम याने गोळीबार केला होता, त्यात यश गंभीर जखमी झाला होता. त्याच प्रमाणे त्याचा भाऊ शामलीन पवार याच्यावर कोयत्याने वार करुन त्यालाही जखमी केले होते. शहरातून हद्दपार केलेल्या गुंडांकडून गोळीबार केला गेला कसा? असा प्रश्न उपस्थित झाला. या घटनेची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेत सबंधीत दोषी पोलीसांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी देवळाली पोलीस ठाण्यात भेट देऊन संशयित सनी कदम बाबत माहिती असलेले पोलीस कर्मचारी यांची माहिती घेतली. यात दोन पोलीस हवालदार व तीन पोलीस शिपाई यांनी कर्तव्य करण्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर रात्री उशीरा कारवाई करण्यात आल्याचे समजते. याबाबत खरात यांनी निलंबनाच्या कारवाईस दुजोरा दिला आहे.
देवळाली कॅम्प गोळीबार प्रकरणी पाच पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 4:20 PM
हाडोळा येथे राहणा-या यश पवार उर्फ बिट्टू याच्यावर सनी कदम याने गोळीबार केला होता, त्यात यश गंभीर जखमी झाला होता.
ठळक मुद्देआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेतलीरात्री उशिरा उपआयुक्त विजय खरात यांनी निलंबित केले.