तालुक्यात टोमॅटो, मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. सदर भाजीपाला मुंबईसह अन्य प्रांतातही पाठवला जातो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी भाजीपाला घ्यायला तयार नाहीत. अनेक शहरातील हॉटेल व्यवसाय बंद असल्याने त्याचा फटका भाजीपाला पिकाला बसत आहे. भाव मिळत नसल्याने भाजीपाला फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
निर्यातक्षम टोमॅटो ४ ते ६ रुपये तर लाल व गारशेल टोमॅटोला प्रति पाच रुपये किलो व प्रति कॅरेट १०० ते १२० रुपये एवढा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कळवण तालुक्यात पाळे खुर्द परिसरात टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. कोरोना निर्बंधांमुळे शेतमाल विक्रीत अडचणी येत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहे. टोमॅटो पिकाला सतत कोसळणाऱ्या भावामुळे तो काढण्याऐवजी शेतामध्येच खराब होऊ लागला आहे. रोज बदलत्या हवामानामुळे औषधाच्या फवारण्या वाढल्या, त्यातून टोमॅटो वाचविण्यात अतोनात मेहनत घ्यावी लागत आहे.
कोट -----
कळवण तालुक्यात टोमॅटो लागवड झाली. मात्र ५ किलो रुपयाने तो विकला जात असल्याने उत्पन्न खर्चदेखील निघत नाही. एकरी लाखो रुपये खर्च टोमॅटो पिकाला येतो. अशीच परिस्थिती राहिली खर्च निघणार नाही. त्यामुळे शासनाने लक्ष घालून न्याय द्यावा.
- यशवंत पाटील, शेतकरी, पाळे
कोट
टोमॅटोसाठी एकरी खर्च
फवारणी व खते - १ लाख रुपये
बांधणी - ९ हजार
सुतळी - १५ हजार
ठिबक - १० हजार
मजुरी- ६० हजार
एकरी उत्पन्न - १ हजार कॅरेट
काढणी व खुडणे - २५ रुपये प्रति कॅरेट
फोटो- २१ टाेमॅटो
===Photopath===
210621\21nsk_34_21062021_13.jpg
===Caption===
फोटो- २१ टाेमॅटो