सविस्तर वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील संतोष बाळू गिते (वय २६) यांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी तीस हजार रुपयांचे आठ एमएम गेजचे सात स्टील बंडल १३ सप्टेंबरला आणून घराच्या बाजूला ठेवले होते. १४ सप्टेंबरला सकाळी उठून बघितले असता घरकामासाठी आणलेले स्टील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनात आले. याबाबत संतोष बाळू गीते यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता यातील संशयित आरोपी राजू रतन लंगडे (वय २३), कैलास भागीरथ लंगडे (२२), शंकर कृष्णा लंगडे (२१), ईश्वर विठ्ठल कडू (२१), विठ्ठल अशोक लंगडे (१९),धुलीचंद ऊर्फ धुळा रामा भगत (४०) यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक राजू दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय रूद्रे, सचिन देसले, राज चौधरी, मुकेश महिरे, महिला पोलीस हवालदार कल्पना जगताप, आदी करीत आहेत.
170921\img-20210917-wa0001.jpg
संशयित आरोपींना ताब्यात घेतांना पोलीस निरीक्षक वसंत पथवे, उपनिरीक्षक राजु दिवटे