शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

वीस लाख लुटणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यासह पाच संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 7:52 PM

एका संशियताने एअर पिस्तूल काढून ती बागुलच्या दिशेने रोखली आणि त्यांच्याकडील २०लाख ४५हजार ३९८ रुपयांची रोकड असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत मारहाण करुन पोबारा केला होता

ठळक मुद्देभरदिवसा वीस लाखांची रोकड लुटल्याची घटना २८ मे रोजी घडली होती १५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

नाशिक : बॅँकांमध्ये रोकड पोहचविणाºया कंपनीच्या एका माजी कर्मचा-याने कट रचून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने उंटवाडी सिग्नलच्या परिसरात भरदिवसा वीस लाखांची रोकड लुटल्याची घटना २८ मे रोजी घडली होती. या घटनेतील संशयितांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये बारावीच्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.ब्रिंक्स इंडिया प्रा.लि. या कंपनीचे कर्मचारी अक्षय बागुल, विशाल निकुंभ हे उंटवाडी परिसरातील एका व्यावसायिकाकडे पैशांच्या वसुलीसाठी आले होते. पैसे घेऊन ते दुचाकीवरून परतणार तोच दुचाकीवरून तिघा संशयित त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून जवळील एका गल्लीमध्ये नेले. त्याठिकाणी एका संशियताने एअर पिस्तूल काढून ती बागुलच्या दिशेने रोखली आणि त्यांच्याकडील २०लाख ४५हजार ३९८ रु पयांची रोकड असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत मारहाण करुन पोबारा केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास गंगापूर पोलीस व गुन्हे शाखा युनिट एकचे पथक संयुक्तरित्या करत होते.सदरची घटना घडली त्यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांना भक्कम असा सुगावा हाती लागलेला नव्हता व ज्या गल्लीमध्ये रोकड पिस्तूलचा धाक दाखवून लुटली त्या भागात कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते, असे आयुक्त डॉ. रविंद्रकूमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.कंपनी सोडून गेलेला कामगार आतिष उत्तम कराटे (२३) याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली असता त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्याने संशियत जितेंद्र रवींद्र शेटे (२२), सनी मन्सुर शेख (२४), शुभम हिराशंकर यादव (२१), प्रशांत काशिनाथ कानडे (२४) व एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे कबुली दिली. पोलिसांनी या सर्व संशयितांना तत्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलीस कोठडी दरम्यान, रोकड लुटीच्या दरोड्यामधील एकूण १४ लाखांची रोकड, दोन दुचाकी, एअर पिस्तूल, मोबाईल असा सुमारे १५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाचही संशयितांना येत्या ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyदरोडा