गोकुळ सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मोठे उद्योग असलेले महिंद्र अॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस यांसह जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर उद्योग सुरू झाले असून, पन्नास हजाराच्या आसपास कामगारांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. पूर्ण ताकदीने उत्पादन प्रक्रिया सुरू झाली नसली तरी हळूहळू उद्योगांची चाके गतिमान होणार आहेत.कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या २३ मार्चपासून ते १४ एप्रिलपर्यंत आणि दुसºया टप्प्यात ३ मेपर्यंत आणि आणि आता १७ मेपर्यंत केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. दरम्यान, २० एप्रिलपर्यंत उद्योगधंदे पूर्णपणे बंद ठेवून कामगारांना सुटी देण्यात आली होती. २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जिल्ह्यातील उद्योगांनी आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. जवळपास सहा हजारांच्या आसपास उद्योगांपैकी पाच हजारांवर उद्योगांना अटी-शर्तीनुसार रीतसर परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला परवानगी देताना कडक निर्बंध लादण्यात आले होते. कामगारांना ने-आण करण्याची जवाबदारी त्या त्या आस्थापनांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार बºयाच उद्योगांनी ही जबाबदारी पार पाडली. परंतु मोठ्या उद्योगांना ने-आण करणे शक्य नसल्याने त्यांनी परवानगी घेतली नव्हती. जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागतील. जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर उद्योग सुरू झाले असून, ५० हजारांवर कामगारांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. पूर्ण ताकदीने उत्पादन प्रक्रिया सुरू झाली नसली तरी हळूहळू उद्योगांची चाके गतिमान होणार आहेत.---४जिल्ह्यातील सातपूर, अंबड, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव, येवला, कळवण, नांदगाव, निफाड, त्र्यंबकेश्वर, वाडीवºहे, गोंदे, माळेगाव, मुसळगाव या औद्योगिक वसाहतीतील सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे असे दहा हजारांच्यावर उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये एक लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात. त्यात रोजंदारीवरील आणि कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाउनच्या काळात या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.--------४महिंद्र अॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस, हिंदुस्थान ग्लास, ग्राफाईट इंडिया, निलय ग्रुप, एमएसएस इंडिया, महिंद्र अॅन्ड महिंद्र इगतपुरी, मायलॉन, क्रॉम्प्टन ग्रीव्हज यांसह मोठ्या कारखान्यांनी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जवळपास पन्नास हजारावर कामगारांना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कामावर बोलावण्यात आले आहे.
पाच हजार उद्योग सुरू; पन्नास हजार कामगार कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 11:03 PM