शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

पाच वर्षांतील नीचांकी अंदाजपत्रक

By admin | Published: September 09, 2016 1:26 AM

महापालिका : महासभेने सुचविली अवघी २३ कोटींची वाढ

नाशिक : महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रशासनाने हात टेकले असतानाच सत्ताधारी मनसेलाही हात आखडता घ्यावा लागला असून, सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात महासभेने अल्पशी २३.५५ कोटींची वाढ सुचवली आहे. त्यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक आता १७६१.५१ कोटींवर येऊन थांबले आहे. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदा महासभेने मंजूर केलेले हे सर्वांत नीचांकी अंदाजपत्रक ठरले आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सन २०१६-१७ साठी १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा ऊहापोह करण्यात आला होता. विकासकामांसाठी फारसा निधी उपलब्ध होऊ शकणार नाही, असेही सूचित करण्यात आले होते. आयुक्तांच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ३८० कोटींची वाढ करत ते १७३७.९६ कोटींवर नेऊन ठेवले होते. स्थायीने महासभेवर अंदाजपत्रक सादर केल्यानंतर सत्ताधारी मनसेकडून त्यात किती कोटी रुपयांची भर पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक होणार असल्याने सत्ताधारी मनसेकडून यंदा अंदाजपत्रकात लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच महापौरांकडून महासभेचा ठराव प्रशासनाकडे पाठविण्यात चालढकल केली जात असल्याने अंदाजपत्रक फुगण्याचाही अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, महासभेने स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात केवळ २३.५५ कोटी रुपयांची वाढ सुचविली असून अंदाजपत्रक १७६१.५१ कोटींवर येऊन थांबले आहे. महासभेचा ठराव नगरसचिव विभागाला प्राप्त झाला असून, विभागाने तो आता समन्वय कक्षाकडे पाठविला आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाच्या प्रती लवकरच सदस्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)