ओझरटाऊनशिप : निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या मातोश्री जगदमाऊली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याचे ध्वजारोहण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहपूर्ण वातावरणात झाले.याप्रसंगी ‘जय बाबाजी’ , ‘जय म्हाळसामाता’ अशा प्रचंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मातोश्री म्हाळसामाता पुण्यतिथीनिमित्त होणाºया जपानुष्ठान सोहळ्यात महिला भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले . जगदगुरू जनार्दन स्वामी मौनिगरी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ओझरच्या जनशांती धाममध्ये धर्मसंस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सलग आठवडाभर चालणाºया सोहळ्या प्रसंगी मौनव्रतातील महिला जपानुष्ठान ,अखंड नंदादीप, यज्ञ ,हस्त लिखित नामजप साधना ,रोज नित्यनियम विधि ,ध्यान, प्राणायाम, एकनाथी भागवत ग्रंथ वाचन , श्रमदान यांसह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्र माच्या ध्वजारोहण सोहळ्यास प्रमुखअतिथी म्हणून मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार,पंचायत समिती सदस्य विजया कांडेकर ,देवपूरच्या सरपंच शीतल आहेर , सई जाधव , सिद्धपिंप्रीच्या सरपंच निर्मला ढिकले , करंजगावच्या सरपंच सोनाली राजोळे , अर्चना गाडेकर , प्रतिभा धनवटे यांसह महिला मान्यवर उपस्थित होत्या . जपानुष्ठान ,यज्ञ ,आणि अखंड नंदादीप आदी सोहळ्याचे ध्वजारोहण उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते झाले.
धर्मसंस्कार सोहळ्याचे ध्वजारोहण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 2:48 PM