राजापूर : राजापूर येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात सध्या दाट धुके मोठ्या प्रमाणात आल्याने कांदा, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.शेतकरी आता औषध फवारणी करून वैतागले आहे. सध्या धुके हे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे. धुके जास्त असल्यामुळे पीक वाचेल कि नाही असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.निसर्ग यावर्षी शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात साथ देत नसल्याने शेतकरी वर्ग अनेक संकटात सापडला आहे. महागडी औषधे द्यायची झाल्यास दहा हजार रु पयांच्या आसपास जातो त्यामुळे. सध्या ढगाळ हवामानामुळे गहू, हरभरा, कांदा रब्बीचे पीक घशेक्यातआली आहे.दोन दिवसापासून धक्याचे प्रमाण खुपच वाढल्याने रब्बीच्या हंगामही वाया जाणार असल्याने शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे. धुक्यामुळे कांदा पिक, गहू, हरभरा व भाजीपाला या पिकांना फटका बसला आहे. शेतकरी वर्ग औषध फवारणी करण्यासाठी आता वैतागले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाले आहे.गव्हाची पेरणी केलेली आहे परंतु ढगाळ हवामानामुळे गव्हाचे पीक पिवळे होत आहे त्यामुळे शेतकºयांना महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ हवामान बदलामुळे आली आहे. हवामान खात्याने सध्या दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकºयांना धडकी वाढली आहे. अजून आठ ते दहा दिवसांमध्ये कांदा काढणीस सुरु वात होणार आहे. परंतु जर पावसाचे आगमन झाले तर कांदा सडून जाईल व शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, यामुळे शेतकरी अधिक संकटात सापडला आहे.(फोटो २६ धुके)
धुक्याने रब्बीच्या पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 5:24 PM
राजापूर : राजापूर येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात सध्या दाट धुके मोठ्या प्रमाणात आल्याने कांदा, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.
ठळक मुद्देधुके हे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी हवालिदल