शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पाणीचोरांना हिसका ; शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:24 AM

महापालिकेने शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम सुरू केली असून, त्यात पाणीचोरी करणाºया ३५ अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

नाशिक : महापालिकेने शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम सुरू केली असून, त्यात पाणीचोरी करणाºया ३५ अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.  शहरातील अनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी महापालिकेने ४५ दिवसांची अभय योजना राबविली होती. परंतु, या योजनेला सुमारे २५०० नळजोडणीधारकांनीच प्रतिसाद दिला. त्यामुळे महापालिकेने सहाही विभागांमध्ये अनधिकृत नळकनेक्शन शोध मोहीम बुधवार (दि.२१) पासून हाती घेतली. त्यानुसार, गुरुवारी (दि.२२) राबविलेल्या मोहिमेत पाणीचोरी करणारे तब्बल ३५ नळजोडणीधारक आढळून आले. महापालिकेने या पाणीचोरांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करत दणका दिला आहे. सदर मोहिमेअंतर्गत नाशिक पश्चिम विभागात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये उपअभियंत्यांनी तक्रार दाखल केल्याने चंद्रकांत जगन्नाथ आगले, संतोष रवींद्र चांदवडकर, चंद्रभागा नारायण कस्तुरे, विशाल देवराम चांदवडकर, मनोज लक्ष्मण काकडे, संजय मोरे, भगवान गांगुर्डे, गणेश राजाराम मुर्तडक, लालाशेट निमाणी, सुधाकर रामभाऊ वाघमारे, सतीश पाटील, मदन गांगुर्डे, मनोज चांदगुडे, गणेश मुर्तडक, प्रकाश दाधीच, कैलास गंगाधार वाघमारे, कुलकर्णी, प्रकाश चोकसी, सुधीर शिंपी, मोफतलाल मेहता या अनधिकृत नळजोडणीधारकांवर गुन्हा दाखल केलेला आहे . तसेच पंचवटी विभागात नीलेश तुपे, मुरलीधर मंडलिक, रोकडे, योगीता साडी सेंटरचे मालक, तर सिडको विभागात इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये माउली प्राइड अपार्टमेंटचे चेअरमन, तसेच संजीव सुखदेव रोकडे, मदन ढेमसे, सातपूर विभागात प्लंबर गौतम श्रीरंग गांगुर्डे, काळे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविली आहे. नाशिकरोड विभागातही आठ नळजोडणीधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हॉटेल्सही रडारवरशहरात मोठ्या संख्येने हॉटेल्स, रेस्टॉरंट आहेत. यापूर्वी शहरातील एका बड्या हॉटेल्सने केलेली पाणीचोरी शिवसेनेच्या नगरसेवकाने उघडकीस आणली होती. त्यामुळे, अनधिकृत नळजोडणीमध्ये काही हॉटेल्स, रेस्टॉरंटचाही समावेश असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळाली असून संबंधित हॉटेल्सही रडारवर असल्याची सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, कुठे पाणीचोरी होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी त्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कळवावी. संबंधितांचे नाव गुप्त ठेवले जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी