देवळा : देवळा शहर व उपनगरात विकासकामे करतांना अडथळा ठरणारी अतिक्र मणे काढण्याची मोहीम देवळा नगरपंचायतीने हाती घेतली असून मालेगाव रस्त्यालगत असलेल्या दौलतनगर मधील अतिक्र मण काढून मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. नागरिकांनी समजूतदारपणा दाखवत अतिक्र मण काढण्यास सहकार्य केल्यामुळे कारवाई शांततेत पार पडल्याची माहिती उपनगराध्यक्ष अतुल पवार यांनी दिली आहे. तत्कालीन ग्रामपालिका अस्तित्वात असतांना शहर व उपनगरात अनेक नागरीकांनी घराचे बांधकाम करतांना घराचा ओटा, पायर्या, किंवा संरक्षक भिंत बांधतांना अतिक्र मण केले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दौलत नगर येथे घराला संरक्षक भिंत बांधतांना तेथील काही नागरिकांनी दिड ते दोन मिटरपर्यंत अतिक्र मण केले होते. दोन्ही बाजूंनी हे अतिक्र मण झाल्यामुळे रस्ता अरूंद झाला होता. यामुळे वाहने चालवतांना सर्वांची मोठी गैरसोय होत होती. अनेक वेळा घरापुढे वाहन लावण्यावरून अथवा वाहन फिरवतांना हया नागरिकांमध्ये वादविवाद व भांडणे होत. नगरपंचायतिकडे देखील याबाबत नागरीकांच्या तक्र ारी येत होत्या. ह्या रस्त्याचे काँक्र ीटीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली होती. परंतु अतिक्र मणामुळे हा रस्ता काँक्र ीटीकरण करण्याच्या कामास अडथळा निर्माण झाला होता. देवळा नगरपंचायतीने याबाबत कडक धोरण अवलंबत हे सर्व अतिक्र मण काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसा उपनगराध्यक्ष अतुल पवार, संभाजी अहेर आदी अतिक्र मण काढावयाच्या यंत्रसामुग्रीसह दौलत नगर येथे आले.तेथील नागरीकांना मोहीमेची माहिती देत रस्त्याचे काँक्र ीटीकरण करतांना अडथळा निर्माण होत असल्यामुळे अतिक्र मण काढण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. नागरिकांनी समजूतदारपणा दाखवत मोहीमेस सहकार्य केल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने हया रस्त्यावरील दोन्ही बाजूची अतिक्र मणे काढण्यात आली. यामुळे रस्ता काँक्र ीटीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला असून काँक्र ीटीकरणाचे कामास सुरूवात झाली आहे.
देवळ्यात अतिक्रमणे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 3:37 PM