चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर शुक्रवारी (दि. २) दुपारी ३ वाजता फुलांच्या नियमित लिलावाचा शुभारंभ समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते होणार आहे. अशावेळी लूटमार, चोरी, गुंडगिरी या सर्व संकटांना शेतकरीवर्गास सामोरे जावे लागते. माल विक्रीची शाश्वती नसते, मालविक्रीची रक्कमदेखील वेळेवर मिळत नाही. या गंभीर बाबी विचारात घेऊन परिसरातील फुले उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या अध्यक्षतेखाली फुले खरेदीदार व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील फुलांचा लिलाव सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. दैनंदिन लिलाव दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच फुले विक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा केली जाणार आहे. फुले विक्रीस आणावी, असे आवाहन करण्यात आहे. (वार्ताहर)
चांदवड कृउबात आजपासून फुलांचा लिलाव
By admin | Published: September 01, 2016 10:43 PM