दिंडोरी : तालुक्यातील सर्वात मोठे तसेच येवला, मनमाड शहरासह शेतीला पाणी पुरवठा करणारे करंजवण धरण रविवारी (दि.१२) दुपारी १२ वाजता ९० टक्के भरल्यामुळे धरणाच्या तीन गेटमधून कादवा नदी पात्रात दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळदार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांना मोठया प्रमाणात पूर आल्यामुळे तालुक्यातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. करंजवण धरण क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणात पाण्याची पातळी वाढत आहे.त्यामुळे वेळोवेळी करंजवण धरणातून पाणी वाढविण्यात येते आहे.करंजवण धरणातून दहा हजार क्युसक पाणी सोडल्यामुळे ओझे, करंजवण पुल पाण्याखाली गेला असून या दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे, तसेच ओझे, करंजवण, खेडले येथील ओहाळांना पुर आला आहे. हे सर्व पाणी कादवा नदीत येते त्यामुळे कादवा नदीने धोक्यांची पातळी ओलांडली आहे.करंजवण धरण भरल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह येवला, मनमाड तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. तसेच कादवा नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे कादवा नदी काटाविरल ओझे, करंजवण, म्हेळूस्के, लखमापूर, अवनखेड गावांना संतर्क राहण्याचे आदेश दिंडोरी-पेठचे प्रांताधिकारी डॉ. संदिप आहेर, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, करंजवण धरण शाखा अभियंता महाजन यांनी केले आहे.
करंजवण ९० टक्के भरले पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 9:34 PM
दिंडोरी : तालुक्यातील सर्वात मोठे तसेच येवला, मनमाड शहरासह शेतीला पाणी पुरवठा करणारे करंजवण धरण रविवारी (दि.१२) दुपारी १२ वाजता ९० टक्के भरल्यामुळे धरणाच्या तीन गेटमधून कादवा नदी पात्रात दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
ठळक मुद्देदिंडोरी : पाण्याचा विसर्ग सुरू; नागरीकांना सतर्कतेचा इशारा