शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

येवल्यातील अतिक्र मणे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:16 AM

अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या येवला शहरातील सुमारे २२५ अतिक्रमणे सोमवारी मध्यरात्री जमीनदोस्त केली. मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त न घेता राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

येवला : अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या येवला शहरातील सुमारे २२५ अतिक्रमणे सोमवारी मध्यरात्री जमीनदोस्त केली. मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त न घेता राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.  येवला शहरात वाहतुकीला अडथळा हा नित्याचाच विषय झाला आहे. ही बाब गांभीर्याने घेत, किमान रस्त्याने वाहतूक सुरळीत चालावी आणि लोकांना पायीदेखील निर्धास्तपणे चालता यावे म्हणून सोमवारी थेट पालिकेच्या अतिक्रमित जागांवरील रहदारीला अडथळा ठरणारी सुमारे २२५ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. जागा दिसली की ठेव टपरी आणि कर पक्के बांधकाम, असा राजकीय आश्रय देणाऱ्यांना पालिेकेने आचारसंहिता लागताच दणका दिला. ही अतिक्रमण मोहीम औटघटकेची न ठरता शहराच्या प्रत्येक चौकात व गल्लीबोळाने मोकळा श्वास घेण्यासाठी प्रत्येक भागातील अतिक्रमणे काढावीत अशी अपेक्षा येवलेकरांची आहे. या मोहिमेमुळे शहरातील महत्त्वाचा, रहदारीचा, मध्यवर्तीचा भाग मोकळा झाल्याचे चित्र दिसून आले.  सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शानिपटांगण आवारात असलेली छोटे मोठे व्यवसाय करणारी अतिक्रिमत दुकाने काढण्यास पालिकेने सुरु वात केली. सप्तशृंगी माता मंदिरालगत असणारी दुकाने देखील हटवण्यात आली. केशवराव पटेल मार्केट परिसरात असणारी अतिक्र मणे देखील हटवली.पालिकेच्या टीमने येवला-विंचूर चौफुलीवर अतिक्र मण केलेल्या फळांच्या दुकानासह आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेले सारे बॅनर देखील हटवले गेले. बस स्थानक परिसरात असणारी हातविक्र ीची दुकाने काढण्यात आली. नगर -मनमाड रस्त्यावर बसस्थानकावर रस्त्यावर थाटलेली दुकाने रस्त्यावरून बाजूला हटवली गेली. मंगळवारी सकाळी विंचूर चौफुली मोकळा श्वास घेत असल्याचे चित्र दिसले. तेंव्हा पालिकेने मोहीम राबवल्याचे लक्षात आले. फत्तेबुरु ज नाका परिसरात काही दुकाने काढण्यात आली. येवला शहराच्या वाहतुकीचा गाडा सुरळीत करण्यासह नागरिकांनी स्वताहून आपली अतिक्र मणे काढावीत अन्यथा अतिक्र मण हटवण्यासाठी पुन्हा अ‍ॅक्शन प्लान तयार करून कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रि या मुख्याधिकारी नांदुरकर यांनी दिली आहे. मिळेल त्या जागेवर अनेकांनी दुकान थाटून त्या ठिकाणी आपले बस्तान मांडले होते.त्यामुळे येणार्या जाणार्या वाहनचालकांना त्रास तर सहन करावाच लागतो. परंतु या लोकाच्या विरोधात तक्र ार कोण करणार हा खरा प्रश्न होता.  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील अतिक्र मणधारकांना एखाद्या तक्र ार अर्जावरून नोटीसा बजावण्यात येतात. अतिक्र मण मोहीम या रस्त्यापुरतीच मर्यादित असल्याने अतिक्र मणाच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम प्रशासन, बीओटीचे अधिकारी व पालिका प्रशासन केवळ कागदोपत्री कायदेशीर कार्यवाही करून केवळ कागदावर असणारे सर्वांग सुंदर येवला शहर कधी चागले बनवणार? असा सवाल नागरिक करत असतांना पालिकेने धाडसी स्वागतार्ह कारवाई केली आहे. यात सातत्य असावे. केवळ गरिबांची अतिक्र मणे न काढता शहरातील धनदांडग्याची अतिक्र मणे देखील काढावी अशी मागणी नागरिक करीत आहे. बेकायदेशीरपणे कोणीही अतिक्र मणे करावीत आण िज्यांची जबाबदारी आहे त्यांनी डोळेझाक करावी, झालेल्या अतिक्र मणाबाबत त्रयस्त माणसाने तक्र ार करावी आण ित्यानंतर जबाबदार अधिकार्यांनी कारवाई करण्याचा फार्स करावा हे नित्याचे झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे व बीओटीचे अधिकारी स्वताहून बेकायदेशीर कामाला पायबंद घालण्याची मानिसकता जो पर्यंत ठेवत नाही तोपर्यंत अतिक्र मणे होतच राहणार, परंतु कर्तव्यदक्ष पालिका मुख्याधिकारी नांदुरकर यांनी धडक कृतीतून आपला परिचय दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम अभियंता अभिजित इनामदार, मुख्यलिपीक बापूसाहेब मांडवाडकर, संगणक अभियंता अभितोष सांगळे, स्वच्छता निरीक्षक सुनील संसारे,घनश्याम उंबरे,अशोक कोकाटे,अशोक कसारे,मुरली जगताप,राजेंद्र जांभूळकर, यांच्यासह पालिकेच्या 55 कर्मचार्यानी ही मोहीम राबविली. काही व्यावसायिक मंगळवारी सकाळी स्वताहून अतिक्र मण काढत असल्याचे दिसून आले.येवले शहरात अचानक रात्री नगरपरिषदेची अतिक्र मण हटाओ मोहीम शिन पटांगण बाजार तळ मनमाड रोड विंचुर चौफुली फत्तेबुरु ज नाका माधवराव संकुल जवळील गणेश मार्केट सह अनेक ठिकाणचे अतिक्र मण हटवले. अतिक्र मण मोहीम स्वागतार्ह असली तरी किरकोळ व्यवसायकांचा पोटपाण्याचा प्रश्नही तीतकाच महत्वाचा आहे. रस्त्याच्या बाजुला व्यवसाय करण्याच्या बाबतीत नगरपरिषदेचे आखिव रेखीव निश्चित धोरण असायला हवे.येवला शहरात उद्योग धंदे नाहीत.सर्व सामान्यांनी काय चोरी करून पोट भरायचे का ? - राहुल लोणारी,  येवलाअन्यथा कडक कारवाई करणारदररोज गावात फिरताना सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या चर्चेतून अतिक्र मण काढण्याची गरज समोर आली. तक्र ारीवरून अतिक्र मणाचा प्रश्न गंभीर झाल्याचे लक्षात आले. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी अतिक्रमणे काढण्याबाबत नियोजन केले. पालिकेच्या जागेवर बेकायदेशीर, विनापरवानगी अतिक्र मणधारकांनी स्वत:हून अतिक्र मणे काढावीत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी माहिती मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक