नाशिक : रविवारी (दि. ५) अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे पूरस्थिती कमी झाली. तथापि, त्यानंतर शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी पथदीप वाकल्याने अंधार असून काही ठिकाणी तर जलवाहिन्या फुटल्याने पाणीदेखील मिळू शकलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.रविवारी (दि.४) शहरात अतिवृष्टी झाल्यानंतर गंगापूर धरणातून सुमारे ४४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदाकाठी असलेला भाग पाण्याखाली गेला. शहरातील नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी यांसह अन्य नद्यांनादेखील मोठ्या प्रमाणात पूर आल्याने संपर्क खंडित झाला होता. सोमवारी (दि.५) पावसाचे प्रमाण कमी झाले आणि पूरस्थितीदेखील कमी झाली. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेत खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते तसेच स्थायी समिती सभापती उद्धव निमसे सभागृह नेता सतीश सोनवणे, आरोग्य समितीच्या सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार, रिपाइंच्या गटनेत्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते.शहरात ज्या ठिकाणी चिखल, गाळ साचला आहे तो तातडीने काढण्यात यावा. तसेच त्यानंतर तत्काळ त्याठिकाणी डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अनेक पथदीप वेडेवाकडे झाले असून, त्याचा प्रवाह घरादारात शिरून दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने पथदीप दुरुस्त करावेत. ज्याठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत.त्या पूर्ववत कराव्यात अशाप्रकारच्या सूचना महापौर भानसी यांनी दिल्या. पूरग्रस्तांना चिखल हटविण्यासाठी साहित्य पुरवावे, तसेच चिखल, गाळ काढण्यासाठी मदत पुरावावी अशाप्रकारच्या विविध सूचना त्यांनी केल्या.अन्नधान्याची मदत करावीपुरामुळे तात्पुरत्या स्वरूपात अनेक नागरिकांना महापालिकेच्या शाळा किंवा धर्मशाळेत स्थलांतरित करावे लागले. याठिकाणी नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी मदत केली. परंतु आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तरतूद असून त्यांच्याकडून मदत पुरवली गेली नसल्याची तक्रार यावेळी गजानन शेलार यांनी केली. पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच धान्य द्यावे अशा अनेक सूचना यावेळी त्यांनी केल्या.पदाधिकाऱ्यांकडून सूचनापूर ओसरू लागल्यानंतर आता रोगराई विशेषत: डेंग्यसदृश स्थिती निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहेत. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने चिखल हटविल्यानंतर त्याठिकाणी डास निर्मूलन औषधाची फवारणी करावी असे पदाधिकाºयांनी दिले आहेत.
पुरामुळे मूलभूत सुविधांची वासलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 1:47 AM