जिवाची धोकेदायक कसरत : सुरगाणा तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीवरील फरशीपूल पाण्याखाली गेल्याने मोटारसायकलला उचलून नेताना नागरिक.
लोकमत न्यूज नेटवर्कसुरगाणा : तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीला पूर आल्याने फरशीपूल पाण्याखाली जाऊन दोन्ही बाजूंचा संपर्क काहीकाळ तुटला होता.गेल्या पाच-सहा दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरू आहे. मंगळवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीवरील फरशीपुलावरून पूरपाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला होता. एका रुग्णाला पलीकडे पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर बाºहे येथील रुग्णालयात न्यायचे होते. मात्र पूल पाण्याखाली गेल्याने जाता येत नव्हते. यावेळी उपस्थित नागरिकांनी दुचाकीलाच उचलून पुरातून चालत दुसऱ्या बाजूला नेले. दरवर्र्षी पावसाळ्यात या फरशीपुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूंकडील गावांचा संपर्क तुटतो. यामुळे पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली जात आहे. झगडपाडा येथील फरशीपुलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक करीत आहेत. मात्र शासनदरबारी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दर पावसाळ्यात या फरशीपुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटतो.