नाशिकरोड : कोरोनामुळे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच श्री विठ्ठलरुक्मिणीचे दर्शन घ्यावे लागले. उपवासानिमित्त बाजारात फराळाचे साहित्य व फळखरेदी करण्यास नागरिकांनी गर्दी केली होती.बुधवारी (दि.१) आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन विहितगाव येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री विठ्ठल मंदिर, देवळाली गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, जेलरोड येथील श्री विठ्ठल मंदिर, मुक्तिधाम मंदिर बंद ठेवण्यात आले होते.सकाळी मंदिरात फुलांची सजावट करून काही मोजक्या भाविकांनी विधीवत पूजा करून मंदिर बंद करून घेतले होते. त्यामुळे भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच भगवान विठ्ठल व रुक्मिणीचे दर्शन घ्यावे लागले. मंदिरातदेखील दर्शन करण्यास न मिळाल्याने रुखरुख लागली होती.एकलहरे येथे सामासिक अंतर ठेवून धार्मिक कार्यक्र मएकलहरे : कोरोनाच्या भीतीमुळे पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जाता आले नाही, तरी येथील विठ्ठल रु क्मिणी मंदिरात आषाढी वारीनिमित्त सामासिक अंतर ठेवून विविध धार्मिक कार्यक्र म घेण्यात आले. सामनगाव परिसरातील कोटमगाव, चाडेगाव, एकलहरे गाव, वीज केंद्र वसाहत येथील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. पहाटे ५ वाजता काकडा आरती, सकाळी ७ वाजता महापूजा, दुपारी फराळ वाटप, हरिभजन व प्रवचन, सांयकाळी पालखी सोहळा मिरवणूक व त्यानंतर हरिपाठ आदी कार्यक्र म सामासिक अंतर ठेवून करण्यात आले. या कार्यक्र मास येताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावून व सॅनिटायझरने हात स्वच्छ करु नच सहभागी होण्याची सक्ती आयोजकांनी केल्याने भाविकांनी शिस्तीचे पालन करत पांडुरंगाचे दर्शन घेतले.
विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:04 AM
कोरोनामुळे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यावे लागले. उपवासानिमित्त बाजारात फराळाचे साहित्य व फळखरेदी करण्यास नागरिकांनी गर्दी केली होती.
ठळक मुद्देमंदिरे बंद : वारकऱ्यांमध्ये निराशा; विहितगाव येथे पूजा