ठळक मुद्देकलात्मक पुष्परचनेने नाशिककर पुष्पप्रेमींना मोहिनीप्रदर्शनाचा समारोप रविवारी संध्याकाळी करण्यात आला.नैसर्गिक घटकांचा वापर करत पुष्पसजावट
नाशिक : श्री गणरायाचे साकारलेले रूप... श्री बालाजी देवस्थान, सप्तशृंगी देवी मंदिरासह इस्कॉन मंदिराचा उभारलेला गाभारा...यांसह ग्लोबल वॉर्मिंग, सायकल चळवळ आणि लहान बाळांच्या गोजिरवाण्या रूपाभोवती केलेल्या कलात्मक पुष्परचनेने नाशिककर पुष्पप्रेमींना मोहिनी घातली.निमित्त होते, पुष्परचनाकार अवधुत देशपांडे यांच्या संकल्पनेतून आयोजित पुष्प उत्सव-२०१८चे प्रजासत्ताक दिनाप्रसंगी या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांच्या हस्ते करण्यात आले.
गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आकर्षक पद्धतीने एकापेक्षा एक सरस भन्नाट संकल्पनेचा वापर करत केलेल्या पुष्पसजावटीने नाशिककरांना आकर्षित केले.
यावेळी तरुण-तरुणींनी पुष्पसजावटीसोबत सेल्फ काढत सोशल मीडियावर ‘पोस्ट’ही केली. सर्वांसाठी मोफत असलेल्या या प्रदर्शनाला नाशिकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे गावाचा परिसरापासून ते ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत आणि सायकल चळवळीपासून ते गिटारपर्यंत असे विविध विषय पुष्परचनेच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न केल्याचे यावेळी दिसून येते. आकर्षकपणे विविध जातीच्या फुलांचा वापर करत साकारलेल्या प्रतिकृती न्याहाळताना पुष्पप्रेमी हरवून गेले होते. या प्रदर्शनाचा समारोप रविवारी (दि.२८) संध्याकाळी करण्यात आला.पुष्पसजावटीतून ४० संकल्पनांचा मेळवैश्विक तपमानवाढ, त्सुनामी, वैद्यकीय व्यवसाय, हृदयरोग जागृती अशा एकू ण ४० संकल्पनांचा मेळ या पुष्प प्रदर्शनात आपल्या कलेतून देशपांडे यांनी घालण्याचा प्रयत्न केला होता. केवळ नैसर्गिक घटकांचा वापर करत पर्यावरणाला कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत पुष्पसजावट करण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून आले. एकूणच या आगळ्या-वेगळ्या पुष्प उत्सवाने नाशिककरांना भुरळ घातली.