लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या दिनदर्शिकेत महात्मा फुले पुण्यतिथी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख न केल्याने मनुवादी दिनदर्शिका सरकारने सुधारित करून नव्याने प्रकाशित करावी, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिले.या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्राची ओळख ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्याच्या महतीने सांगितले जाते. मात्र युती सरकार कडून काढण्यात आलेल्या शासकीय दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नाही ही अत्यंत गंभीर बाब असून, मनुवादी सरकारकडून महामानवांचा अवमान केला जात आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून वारंवार चुका होत असताना सबंधितांवर कुठलीही कारवाई होत नाही. युती सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील महापुरुषांचा अवमान करत आहे. महापुरुषांच्या पुण्यतिथी आणि महापरिनिर्वाण दिनाचा सरकारला विसर पडावा ही दुर्दैवी घटना आहे. सरकारकडून महामानवांचा होत असलेल्या अवमानामुळे सरकार मनुवादी व्यवस्थेचा पुरस्कार करते आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य सरकारने माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या संबंधितांवर कारवाई करावी तसेच सदर चूक दुरुस्त करून पुन्हा नव्याने दिनदर्शिका प्रकाशित करावी. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाअंती देण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष अंबादास खैरे, योगेश निसाळ, प्रफुल्ल पाटील, किरण मानके, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, सुनील घुगे, भूषण गायकवाड, आकाश कोकाटे, रोहित जाधव, प्रकाश भोर, संतोष पुंड, दिलीप कांबळे, समर सोनार, दीपक बने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाच्या दिनदर्शिकेतून फुले, आंबेडकर गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 6:31 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या दिनदर्शिकेत महात्मा फुले पुण्यतिथी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा ...
ठळक मुद्देसुधारणा करा : राष्टÑवादी युवकची मागणी