भाड्याने टाक्या घेण्याचा प्रस्ताव रद्द करावा असा प्रस्ताव पुढील स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्याचे आदेश समितीचे सभापती गणेश गिते यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना दिले आहेत.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनची टंचाई जाणवत हाेती. राज्यभरात ऑक्सिजनची टंचाई असल्याने त्यावेळी महापालिकेने ऐनवेळी अशाप्रकारे संकट येऊ नये यासाठी ऑक्सिजन टाक्या खरेदी करण्याचे ठरवले. त्यावेळी सर्वाधिकार प्रशासनाकडे असल्याने एका अधिकाऱ्याने टाक्या विकत घेण्याऐवजी भाड्याने दहा वर्षाने घेण्याचा प्रस्ताव तयार केला. वास्तविक कोरेानाचे संकट टळल्यानंतर टाक्यांमध्ये साठवून ठेवण्याइतपत ऑक्सिजनची गरज भासेल का असा प्रश्न होता. लोकमतने या निविदेविषयी शंकाही उपस्थित केल्या होत्या. मात्र, तरीही कोरोनाच्या नावाखाली बिटको रुग्णालयात १३ तर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १० केएल टाक्या बसविण्याचे ठरवून त्यासाठी ठेकेदाराला भाडे देण्याचे ठरले. ऑक्सिजन देखील त्याच ठेकेदाराकडून घेण्याचे देखील ठरले. त्यानुसार निविदा मंजूर करण्यात आली असली तरी आता कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत घटली असून ऑक्सिजनची तेवढी गरज नाही. त्यातच मविप्र रुग्णालयात कोरोना काळात महापालिकेने मदत म्हणून दिलेल्या दोन ऑक्सिजन टाक्या वापराविना पडून आहेत. ही सर्व बाब काॅंग्रेस नगरसेवक राहुल दिवे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आता भाड्याचा प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश आयुक्त गणेश गिते यांनी दिले आहेत.
इन्फो..
कोराेना काळात आपत्ती म्हणून प्रशासनाला आर्थिक अधिकार देण्यात आले होते. मात्र, त्यातून अनेक गैरप्रकार चर्चेत येत असून आता त्यावर महापालिकेत खल सुरू झाला आहे. अनेक प्रकरणे आता अशाप्रकारे बाहेर येण्याची शक्यता आहे.
.......
या बातमीत ७ सप्टेंबर रोजीची हॅलोमधील मेनची बातमी वापरावी.