चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील लोहमार्ग क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने उड्डाणपूल बनविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.उड्डाणपुलाचे काम सुरू करावयाचे असल्याने रस्त्यालगत असलेली दुकाने, टपऱ्या हटविण्याचे आदेश रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. फाटक बंद होणार असल्याने या मार्गावरील बससेवा बंद होणार असून, शालेय विद्यार्थी व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी अडचण निर्माण होणार आहे. रस्त्याच्या कडेची दुकाने काढली जाणार असल्याने व्यावसायिकांनी पर्यायी जागेची मागणी केली असून, रस्ता बंदमुळे येथील उद्योगधंदे कोलमडून पडणार आहेत. ओझर-शिर्डी महामार्गावर रहदारीत वाढ झाल्याने खेरवाडी येथे फाटक करून त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.त्याबाबत रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाºयांनी नुकतीच खेरवाडी येथे जाऊन ग्रामसभा घेत ग्रामस्थांसोबत चर्चा केली. खेरवाडी येथील रेल्वे फाटक क्र. ९४ फाटक वाहतूक कोंडीचे कारण ठरत असल्याने बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे महारेलचे अभियंता स्वानंद राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी सुभाष गवई व व्यावसायिक, शेतकरी यांनी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम अधिकाºयांकडे अडचणी कथन केल्या. रेल्वे गेट बंद होणार असून, दुचाकी व छोट्या वाहनांकरिता जवळच्या भुयारी मार्गाचा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मार्गावरून धावणाºया बस बंद होणार असून, शालेय विद्यार्थ्यांना मोठी अडचण होणार आहे. शेतकºयांना माल वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.सद्यस्थितीत परीक्षेचा कालावधी सुरू झाल्याने चांदोरी, सायखेडा, सय्यदपिंप्री येथेशाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तसेच याच परिसरातून भाजीपाला व शेतमाल नाशिकच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातो, त्यामुळे आता शेतकºयांना चितेगाव, चांदोरीमार्गे जावे लागणार आहे, तर खेरवाडी येथील शेतकºयांना ओझरला जाण्यासाठी सुकेणेमार्गे जावे लागणार आहे.उड्डाणपुलानंतर प्रवास सुखकरउड्डाणपुलाचे काम साधारणपणे ८ ते १२ महिने चालणार असून, येथील उद्योगधंद्यांवर परिणाम होणार आहे. मात्र उड्डाणपूल झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास सुखकर व जलद होणार असल्याचे मतदेखील अनेकांनी व्यक्त केले आहे.
खेरवाडी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:44 PM
निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील लोहमार्ग क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने उड्डाणपूल बनविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
ठळक मुद्देआराखडा तयार; पर्यायी व्यवस्थेची मागणी